What is Sunstroke? | उन्हाळी लागणे म्हणजे का ?

What is Sunstroke? | उन्हाळी लागणे म्हणजे का ?

heat,nas, leg _cramp,muscle_fatigue, aurangabad, hot, summer, s ambhajinagar, muscle_cramp, legs_pain,muscle_relaxants, acupressure, muscle_tightening, temperature, season, summer-2025, muscle_spasms,

 उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या.....!

heatstroke

   डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे.  उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि त्याचबरोबर जळजळ, मुत्रनलीकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे. हा त्रास मुख्यत्वे उन्हाळ्यात उद्भवतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असते. आपण बघणार आहोत उन्हाळी लागण्याची करणे आणि त्यावरचे घरगुती उपाय...!

कारणे :-

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कामी होतं. पाणी कमी झाल्याने लघवीत क्षारचं प्रमाण वाढतं. म्हणजेच शरीरात पाणी नसल्याने ‘उन्हाळी लागते’. स्त्री आणि पुरुषांमध्ये हा त्रास वेगवेगळ्या प्रकारे असतो.

पुरुषांमध्ये  लघवीला व मुत्रानालीकेत आणि जळजळ व आग होण्यासारखी लक्षणे दिसतात तर स्त्रियांमध्ये हीच लक्षणे काही प्रमाणात तीव्र असतात. स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याबरोबरच कळ येणे आणि रक्तस्त्रावाचा त्रास होतो. यापासून लहान मुलंही वाचलेली नाहीत .या समस्येवर काही घरघुती उपाय आहेत. चला तर बघुयात !!

उपाय :-

१) पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे ‘भरपूर पाणी प्या.’

२) खाण्याचा सोडा आणि लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्यास त्रास कमी होतो.

३) शहाळ्याचे पाणी प्या.

४) धने, जिरे, बडीशेप भिजवून, कुस्करून त्यांना पाण्यात मिसळा व त्यात खडीसाखर घालून प्यावे.

५) कलिंगडचा रस प्या.

६) नारळाच्या पाण्यात धने व गूळ घालून प्या.

७) नीरा प्यायलाने देखील फायदा होतो.

८) आमसुलाचे पाणी, कोकम सरबत साखर घालून प्यावे.

९) कैरीचे पन्हे वेलदोडा घालून प्यावे.

१०) पुदिन्याचे पाणी प्या !!

११) रोज दोन विलायच्या खाव्यात..

१२) चूना ओला करून. तो बेंबित भरा. लगेच आराम मिळतो.

१३) एका बादलीत थंड पाणी भरून मग त्यात पाय सोडून बसा.

उष्माघात (Heatstroke) चे दोन प्रकार :-

1. श्रम संबंधित उष्माघात (Exertional Heat Stroke) : शारीरिक श्रम करत असताना, विशेषतः उन्हात काम करताना किंवा व्यायाम करताना होतो. खेळाडू, मजूर, शेतकरी यांना धोका अधिक असतो.

2. अश्रम संबंधित उष्माघात (Non-exertional Heat Stroke) : दीर्घकाळ प्रखर उन्हात किंवा उष्ण वातावरणात राहिल्यास होतो. लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, तसेच ज्या लोकांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रण कमी असते त्यांना याचा जास्त धोका असतो.

उष्माघाताची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे :-

1.शरीराचे तापमान १०४°F (४०°C) पेक्षा अधिक

2.घाम येणे थांबते (कोरडी त्वचा)

3.चक्कर येणे आणि थकवा

4.डोकेदुखी, मळमळ, उलट्या

5.हृदयाचे ठोके वाढणे (Tachycardia)

6.भान हरपणे, गुंगीत जाणे किंवा बेशुद्धावस्था

7.हात-पाय मुरगळणे किंवा झटके येणे.

उष्माघाताचा धोका कोणासाठी अधिक असतो : वयोवृद्ध आणि लहान मुले, हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण,मधुमेह, लठ्ठपणा असलेले लोक, बाहेर उन्हात काम करणारे मजूर आणि शेतकरी,खेळाडू आणि सैन्यातील जवान.


Heatstroke | उपाय आणि उपचार : उष्माघात झाल्यास खालील गोष्टी त्वरीत करा :-

1.व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवा.

2.कपडे सैल करा आणि शरीरावर थंड पाणी शिंपडा.

3.बर्फाच्या पिशव्यांचा उपयोग करून मान, बगल आणि मांड्यांवर शेक द्या.

4.थंड पाणी पाजण्याचा प्रयत्न करा, पण बेशुद्ध व्यक्तीला पाणी पाजू नका.

5.तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

Heatstroke | उष्माघात टाळण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या :-

1. भरपूर पाणी प्या

2. जरी तहान लागली नसली तरी दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्या.

3. हलके आणि सैलसर कपडे परिधान करा

4. उष्ण हवामानात सुती कपडे घाला.

5. थेट उन्हापासून बचाव: शक्यतो दुपारच्या वेळेस (११ ते ४) बाहेर जाणे टाळा.

6. शारीरिक श्रम कमी करा: प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळा.

7. योग्य आहार घ्या: फळांचे रस, नारळ पाणी, ताक यांचा समावेश आहारात करा.

रुग्णालयात केले जाणारे  उपचार :-

1.Intravenous (IV) fluids देऊन शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढणे.

2.शरीराचे तापमान कमी करण्यासाठी विशेष शीतकरण तंत्र वापरणे (जसे की आईस बाथ किंवा ओले कपडे गुंडाळणे).

3.हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास यांचे निरीक्षण.

"उष्माघात (Heatstroke) ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे लक्षणे ओळखणे, तातडीने कृती करणे आणि योग्य प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. गरम वातावरणात स्वतःची काळजी घेणे आणि इतरांनाही सावध करणे गरजेचे आहे."


माहिती अधिक लोकांना शेअर करा !

Also you like read article

https://sanjeevanineurotherapy.blogspot.com/2023/05/summer-special.html

Kansa Thali Massage | कांस्य थाली मसाज

सौजन्य:- 

संजीवनी न्यूरोथेरपी ॲंड स्पाईन केअर सेंटर

🌿 आरोग्यम् धनसंपदा 🌿

🥗🧘🏻‍♀️🚴‍♂️🏊‍♂️🤾‍♂️🏌️‍♀️⛹️‍♀️🏋️‍♀️🧘🏻‍♂️🥙


Comments

Popular posts from this blog

Kansa Thali Massage | कांस्य थाली मसाज | Summer Heat 2025

Summer Special / उन्हाळा स्पेशल लेख