Summer Special / उन्हाळा स्पेशल लेख

heat,nas, leg _cramp,muscle_fatigue, aurangabad, hot, summer, s ambhajinagar, muscle_cramp, legs_pain,muscle_relaxants, acupressure, muscle_tightening, temperature, season, summer-2025, muscle_spasms,

                        🌞💦🍉 उन्हाळा स्पेशल लेख 🍉💦🌞 


🔥 उन्हाळ्यामधील होणारा त्रास जसे की उष्णता वाढणे,उष्माघात,हातापायाची आग सुटणे,हातातून घाम येणे,थकवा वाटणे,डोळे जळजळ करणे,डोके दुखणे,उन्हाळी लागणे,लघवी करताना जळजळ होणे,इत्यादी यावर आपण घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. 💥

                                                 🎯🍉 उपाय 🥥🌈🆒 

✅ तुम्ही दररोज 1तास दुपारी किंवा संध्याकाळी बादलीभर थंड पाण्यात पाय सोडून बसावे,जास्त उष्णता जाणवल्यास              दिवसभरात सकाळ-संध्याकाळ दोन वेळा थंड पाण्याने अंघोळ करावी. 🚿🪣🏊‍♀️

✅ रात्री झोपताना कोरफडीचा गर पायाला लावून झोपू शकता 🍃🦶

✅ दररोज दुपारी जेवणानंतर सब्जा टाकून लिंबू शरबत किंवा वाळा शरबत घेऊ शकता. 💧🍹

✅ कोरफडीच्या गराणे डोकेदुखीसाठी तसेच शांत झोपेसाठी डोक्याची-कपाळाची मालिश करू शकता. 🙆‍♂️🧠☘️

✅ डोळ्यांच्या जळजळीसाठी सकाळ-संध्याकाळ पतंजलीचे दिव्य गुलाब जल चे 2-2 थेंब दोन्ही डोळ्यांमध्ये टाकू शकता. 😂👁️💧💧

✅ उन्हाळ्यामध्ये पाणी माठातील प्यावे व त्या पाण्यामध्ये तुम्ही वाळ्याच्या काड्या टाकू शकता किंवा वाळा पावडर टाकू            शकता त्यामुळे पाणी गोड लागते व वाळ्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. 👌🫗🪵

उन्हाळ्यात ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह        कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. 🥛

रात्री झोपताना तळ पायाला तेल लावून काश्यच्या वाटीने मसाज करावा 🦶

✅ उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी वॉटर रीच फूड जसे की कलिंगड,खरबूज,द्राक्ष जास्त              खावे. यामुळे शरीराचा थकवा कमी होतो, आळस दूर होऊन फ्रेश वाटते. 🍊🍉🍇

✅ जेवणापूर्वी नेहमी 2-3 काकड्या खाव्यात व नंतर जेवण करावे. 🥒🍅

✅ शक्यतो उन्हात फिरू नये परंतु अत्यावश्यक कारणाने बाहेर जायची वेळ आली तर डोक्यावर कॅप घालावी, डोळ्यावर            गॉगल घालावा. 🧢🕶️

✅ उन्हाळ्यामध्ये दररोज एक ग्लास नारियल पाणी पिले पाहिजे यामुळे उष्णता कमी होते.नारियल पाण्यामुळे लघवीची              जळजळ कमी होते. 

                                                         🏹⏰ पथ्य ❌🍕 



❎ उन्हाळ्यामध्ये चहा,तेलकट,तिखट,मसालेदार,नॉनव्हेज,मैदा-बेकरी ॲटम,पॅक फुड,चायनीज पदार्थ,शिळे अन्न,हॉटेलमधील पदार्थ खाऊ नये. 🍞🍕🍔

❌ फ्रिजमधील पाणी पिऊ नये, उलट फ्रीजच्या पाण्यामुळे शरीराची उष्णता वाढते. फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेवलेले पदार्थ खाऊ नये. 🥪🍱

✖️ उन्हाळ्यामध्ये शक्यतो काळ्या रंगाची कपडे घालू नये. 🧥👖

🕎 खूप स्पीडने फॅन लावू नये, त्यामुळे अंगदुखी होते,आळस वाढतो, वात वाढतो. ☠️🦿

🧃 उन्हाळ्यामध्ये बाहेरील कुठल्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स पिऊ नये कारण त्यात भरपूर प्रमाणात केमिकल्स,प्रिरझर्वेटिव्ह,कार्बन व साखर असते. कोल्ड्रिंक्स हे टॉयलेट क्लीनर सारखे आहे त्याने आपल्या पोटाला स्मशानभूमी बनवू नका. 🍾🍷

Also you like read article

Kansa Thali Massage | कांस्य थाली मसाज



सौजन्य

 संजीवनी न्यूरोथेरपी ॲंड स्पाईन केअर सेंटर

🌿 आरोग्यम् धनसंपदा 🌿

🥗🧘🏻‍♀️🚴‍♂️🏊‍♂️🤾‍♂️🏌️‍♀️⛹️‍♀️🏋️‍♀️🧘🏻‍♂️🥙

Comments

Popular posts from this blog

Kansa Thali Massage | कांस्य थाली मसाज | Summer Heat 2025

What is Sunstroke? | उन्हाळी लागणे म्हणजे का ?